समाजाचे आपण काही देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे. यामुळेच बेळगावच्या जलतरण क्षेत्रात उत्तमोत्तम खेळाडूंची एक फॅक्टरी ते झालेत, ज्यांना सरळ चालता येत नाही अशा दिव्यांगांना पोहायला शिकवून नव्हे तर जागतिक विक्रम करायला लावूनही ते स्वस्थ बसत नाहीत, विविध सामाजिक कार्यात ते आघाडी घेतात, उमेश कलघटगी असे त्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे, आपली एक स्वतंत्र ओळख त्यांनी तयार केली आहे ते बनले आहेत बेळगाव live चा आठवड्याचा माणूस …
स्वतः एक मध्यमवर्गीय घरात जन्मलेले, पेशाने सराफ असलेले मात्र वेगळी वाट निवडून त्यात एक स्थान निर्माण केलेले कलघटगी आज आपल्या कर्तबगारीच्या जीवावर मोठे झाले आहेत. ज्योतीने ज्योत पेटवा हे ब्रीद ठेऊन त्यांची कामगिरी अविरत सुरु आहे पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत ते राबत राहतात.
आज गोवा वेस येथे जो महा पालिका रोटरी जलतरण तलाव दिसतो तो त्यांच्याच परिश्रमाचे फलित आहे, त्यांनी घडविलेले जलतरणपटू आज विश्वात भरारी घेत आहेत, दरवर्षी उन्हाळी सुट्टीत ते लहान मुले आणि दिव्यांगांसाठी विशेष शिबीर घेतात, केएलई संस्थेच्या आंतर राष्ट्रीय तलावाची जबाबदारीही त्यांच्याच कडे आहे.
अक्वेरीयस स्विमिंग क्लब चे ते अध्यक्ष आहेत, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिअशन चे कार्यकारी सदस्य आहेत, ते स्वतः एक चांगले क्रिकेटपटू म्हणून गणले जातात. राघवेंद्र अन्वेकर, राजेश शिंदे सारखे मोठे खेळाडू त्यांनी घडविले आहेत.
त्यांचे कार्य असेच सुरु राहावे हीच बेळगाव live कडून शुभेच्छा!!!
उमेश कलघटगी
जलतरण प्रशिक्षक
मोबाईल 9448187333
But Umesh Kalghatgi couldn’t succeed in my case !!!
Ha ha….