बेळगाव दि १९-बेळगाव सीमाप्रश्नी मराठी बांधवावर होणारा कर्नाटकी अत्त्याचार आणि सुप्रीम कोर्टातील कामकाजाबद्दल असलेली सध्याच्या सरकारची उदासीनता सध्या चाललेल्या अधिवेशनात मांडणार असून राणे कुटुंबीय सीमा वासीयांच्या पाठीशी कायम आहेत असे ठाम आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.
बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शाहीर अमर शेख यांच्या जन शताब्दी निमित्य मराठा मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सीमा भागाचे नेते किरण ठाकूर माजी महापौर मालोजी अष्टेकर, आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर ,उपमहापौर नागेश मंडोळकर, कॉम्रेड कृष्णा मेणसे, नागेश सातेरी , प्रा आनंद मेणसे आदी उपस्थित होते.
यावेळी बेळगावच्या नूतन महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर यांच्यासह ३२ मराठी नगर सेवकांचा सत्कार करण्यात आला .
बेळगावातील सात लाख मराठे रस्त्यावर उतरले कर्नाटकी पोलिसांनी अन्याय केला परवानगी नाकारली हे सगळे अन्याय कर्नाटक सरकार बेळगावातील मराठी माणसावर करत असून कर्नाटकने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड लोकांचा विचार करावा ..सध्या प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बेळगावातील बेळगावातील मराठी माणसावरील अन्याय थांबले नाहीत तर आमचा तिसरा डोळा आम्ही उघडला तर महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड लोकांच काय असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला ..
महाराष्ट्राच्या आधाराची गरज
चंद्रपूर मधील लोकासाठी जस आंध्र प्रदेश सरकारने आधार कार्ड ची सुविधा तेलगु मध्ये केली तशी महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी माणसासाठी आधार कार्ड सुविधा मराठीत द्यावी या साठी प्रयत्न करूयात . सीमा लढ्यास मरगळ आली आहे अस म्हणणें चुकीचे असून सुप्रीम कोर्टातील निकालाच्या अगोदर येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे असे मत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.