Sunday, December 22, 2024

/

सुरेश अंगडी यांनी आत्मचिंतन कराव-

 belgaum

ज्यांच्या शिरपेचात आतापर्यंत विकासाचा मानाचा तुरा खोवला गेला नाही आणि ज्यांनी  तीन टर्म खासदारकी भोगूनही त्यांच्या विकासाची पाटी कोरीच राहिली असे सुरेश अंगडी सध्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठा समाजावर वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा चर्चेत आलेले आहेत. खासदार सुरेश अंगडी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी अनेकदा सार्वजनिक समारंभात एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या विरोधात ते बरळले आहेत.

महाराष्ट्रा नंतर बेळगावात अलीकडेच झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला मिळालेल प्रचंड यश,पालिकेतील मराठी भाषिक नगरसेवकांच संख्याबळ त्यांना खुपल असावं की काय व त्यातूनच त्यांनी आपल्या पोटातील मळमळ बाहेर काढून समिती आणि मराठी भाषिका बद्दल वक्तव्य केल असेल. गेल्या काही वर्षात अंगडी यांनी शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे आहेत असंही वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता . संभाजी महाराज बलिदान दिना दिवशी शहरातील संभाजी चौकात उत्तर प्रदेश निवडणुकीच्या विजयोत्सव कार्यक्रमात पुतळ्या समोर जल्लोष केला होता त्यानंतर नूतन भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनीयांच्या पद ग्रहण समारंभात समिती कॉंग्रेस नगरसेवक हे महा पालिकेत भाऊ भाऊ असून दोघे मिळून खाऊ आहेत अस वक्तव्य केल होत.

गेल्या पंधरा वर्षात केंद्र सरकार कडून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामाठी मंजूर केला जातो त्या निधीचा बेळगाव शहराच्या विकासासाठी किती विनियोग केला ?बेळगाव शहरातील लोकांच्या नजरेत भरेल असे कोणते भरीव कार्य केले हे त्यांनी प्रथम याच आत्मचिंतन कराव आणि मगच दुसऱ्यावर शिंतोडे उडवावेत. शेजारच्याच हुबळी धारवाडचे खासदार प्रह्लाद जोशी हे हुबळी धारवाड शहराच्या विकासासाठी नेहमीच कार्यतत्पर राहिले आहेत  केंद्र सरकारची एकही योजना त्यांनी आपल्या हातून घालवली नाही आय आय टी स्थापना पास पोर्ट कार्यालय सुरुवात  पासून हुबळी विमान तळाचा दर्जा नसतात देखील मुंबई बंगलोर हवाई सेवा सुरु करण्यापर्यंतची सगळी कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. .किमान त्यांचा तरी आदर्श अंगडी यांनी घ्यायला हवा होता. गेल्या कित्येक वर्षापासून कपिलेश्वर उड्डाण पुलाच काम आणि पासपोर्ट कार्यालय सुरु करणे ही काम रेंगाळली होती याचा पाठपुरावा स्थानिक प्रशासनाने वेळीच न केल्याने वेगाने काम होऊ शकली नव्हती ही वस्तीस्थिती आहे मात्र हे काम आपणच केलो हे भासवण्याचा प्रयत्न चालविला आहे .

भारतीय लष्कराला कमांडो ट्रेनिंग साठी देण्यात आलेली जागेची लीज मुदतवाढ संपायच्या आत रद्द करण्यात आली या मागे कोण आहे? बेळगाव शहराच नाव सात समुद्रा पार पोचवणारी, सीमेवर लढणारे प्रत्येक कमांडो प्रशिक्षित करणारी जुनियर लीडर्स विंग ची फायरिंग रेंज स्थलांतरित करण्याची तातडीची गरज आहे का ? याचा विचार देखील व्हायला पाहिजे. देश प्रेमाच बाळकडू पाजणाऱ्या भाजप पक्षाचे नेतृत्व करणारे खासदारानी देशाभिमानाच्या गोष्टी करू नयेत. यापूर्वी अंगडी हे समितीवर अनेकदा घसरलेत एवढ असताना अजूनही त्यांची  मराठी विरोधी  वक्तव्य थांबली नाहीत त्यामुळे अंगडीना  मराठीची कावीळ झाल्यानेच ते अश्या प्रकारच बेताल वक्तव्य करत सुटले आहेत व गेल्या तीन निवडणुकात मराठी भाषिकांनी त्यांना केलेल्या भरघोस मतांचा विसर त्यांना पडला आहे. निदान या पुढील काळात तरी त्यांच्या वर्तनात सुधार व्हावा हीच इच्छा !!!

लेखन- प्रशांत बर्डे जेष्ठ पत्रकार बेळगाव

मोबा -०९३४२२९११३९

 

 

 

Suresh angdi mp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.