बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चाच्या संयोजकावर पोलीस प्रशासनाने दडपशाही सुरुच ठेवली आहे. संयोजका ना 153अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या सारखे आक्षेप घेत मोर्चाच्या अगोदर नोटीस बजावली होती तेंव्हा पासून दर तारखेला पेशी होत आहे.या संयोजकांना तारीखपे तारीख पडत आहेत त्यांना त्रास होत आहे. गुरुवारी सायंकाळी पुन्हा संयोजकाची पेशी झाली यावेळी 8 एप्रिल ही पुढची तारीख देण्यात आली.
मराठी आणि मराठा मोर्चा अत्यंत संयम शिस्त आणि शांततेत पार पडला असताना पोलीस प्रशासन आयोजकांना त्रास देत आहेत.
सकल मराठा समाज प्रवक्ता गुणवंत पाटील बेळगाव live शी बोलताना म्हणाले की मोर्चाचे यश पाहून केवळ मराठी भाषिक आहोत म्हणून पोलीस दडपशाही करताहेत याविरोधात पोलीस प्रशासनास जाब विचारण्यासाठी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे यासाठी रविवारी 2 एप्रिल सायंकाळी 5 वाजता बैठकीच आयोजन केलं आहे. मराठी मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित रहावे अस आवाहन करण्यात आलं आहे.