बेळगाव दि 9- मराठा मोर्चा अत्यंत शिस्त आणि शांततेत होऊन एक महिना होत आला तरी पोलिसांनी मराठा मोर्चा संयोजिका वरील केस अद्याप मागे घेतली नाही . मोर्चा संयोजकावर मोर्चात दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या बद्दल नोटीस बजावली होती .
पोलीस उपायुक्त जी राधिका याच्या समोर सुनावणी झाली असता पुढची तारीख देण्यात आली आहे. शिव सेनेचे प्रकाश शिरोळकर अनुपस्थित राहिल्याने16 मार्च रोजी पुढील सुनावणी होणारआहे. सुरुवातीला पोलिसा कडून एक तर मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून आडकाठी दुसरीकडं मोर्चा शिस्त आणि शांततेत झाला असला तरी अजुन संयोजका ना त्रास देणे सुरूच आहे.