बेळगाव दि9- हालगा जुने बेळगाव बेळळारी नाला येथे अतिक्रमण करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी शेती बचाव समिती शहापूर ने केली.
निवासी जिल्हाधिकारी आणि पालिका अभियंत्या भेटून निवेदना द्वारे ही मागणी केली आहे . शहापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीची प्रत देण्यात आली. शेतकरी बंधूना अरेरावी करणार्या महेंद्र धोगंडी व त्यांच्या सर्व भावांवर सरकरी मालमत्ता हडप करुन नूकसान करत असल्याबद्दल त्यांना न्यायालयात खेचून अद्दल घडवावी असे सांगण्यात आले. यावेळी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर, अमृत भाकोजी, राजू मर्वे,शंकर बाबली आदी उपस्थित होते.