Wednesday, December 25, 2024

/

ऊन्हाळ्याचे विकार मुत्र विसर्जन समस्या- डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

 

सतत धावपळीच्या ह्या जीवनात आपण पाणी कमी पिणे व वेळेवर लाघवी न करणे या सामान्य सवयी मुळे हि आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

लघवी करताना दाह व वेदना होणे ही डिसूरिया(dysuria) या समस्येची लक्षणे गंभीर असू शकतात.लघवी करताना होणारी समस्या यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)याचे एक देखील लक्षण असू शकते.वारंवार लघवीला होणे,लघवी थांबवता न येणे व लघवी करताना त्रास होणे ही डिसूरिया ची लक्षणे असू शकतात.ही लक्षणे पुरुषांपेक्षा तरुण महिलांमध्ये अधिक आढळतात.कारण तरुण स्त्रीया प्रजननक्षम असतातअसतात.वयस्कर लोकांमध्ये प्रोस्टेडच्या समस्येमुळे लघवीला दाह व जंतुसंसर्ग होऊ शकतो.

डिसूरिया व यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)या दोन समस्या समान नसतात.

लघवी करताना होणा-या वेदना गंभीर विकाराचे लक्षण असू शकतात

 

लघवी करताना दाह व वेदना होणे ही डिसूरिया(dysuria) या समस्येची लक्षणे गंभीर असू शकतात.लघवी करताना होणारी समस्या यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)याचे एक देखील लक्षण असू शकते.वारंवार लघवीला होणे,लघवी थांबवता न येणे व लघवी करताना त्रास होणे ही डिसूरिया ची लक्षणे असू शकतात.ही लक्षणे पुरुषांपेक्षा तरुण महिलांमध्ये अधिक आढळतात.कारण तरुण स्त्रीया प्रजननात जास्त अॅक्टीव्ह असतात.वयस्कर लोकांमध्ये प्रोस्टेडच्या समस्येमुळे लघवीला दाह व जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच जाणून घ्या  लघवी करताना होणारा त्रास नेमका कोणत्या कारणांमुळे वाढतो ?

डिसूरिया व यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)या दोन समस्या समान नसतात.

डिसूरियाची  लक्षणे पेल्विक भागात व मूत्रमार्गात आढळतात. डिसूरियामुळे मूत्रमार्गातील अवयवांना जंतूससंर्ग होतो.दुर्मिळ परिस्थितीत काही जिवाणूंमुळे देखील डिसूरिया होतो.वारंवार होणा-या अडथळ्यामुळे मूत्रमार्गात व त्याजवळील अवयवांमध्ये विकृती येते व या विकृतीमुळे त्या अवयवांच्या कार्यात बिघाड होतो.यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन) हे देखील डिसूरिया ही समस्या होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.त्याचप्रमाणे लघवीला त्रास होण्याची आणखी अनेक कारणे देखील असू शकतात.

डिसूरिया समस्या निर्माण होण्याची कारणे-

पाणी कमी प्रमाणात पिणे-

डिसूरियाचे प्रमुख कारण पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थ न घेणे हे असू शकते.प्रौढाच्या शरीरात ५५ टक्के व अर्भकाच्या शरीरात ७५ टक्के पाणी असते.शरीरात पुरेसे पाणी नसेल तर शरीराच्या विविध कार्यावर त्याचा दुष्पपरिणाम होतो.तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे तुमचे वय,लिंग आणि उर्जेच्या गरजेनुसार ठरते.

उदा.दोन ते तीन वर्षांच्या मुलाला १००० ते १४०० कॅलरीजची गरज असते. त्यामुळे त्याने दररोज १३०० मिली पाणी पिणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे प्रौढ महीलेला दररोज २.७ ली. व प्रौढ पुरुषांना ३.७ ली.पाण्याची गरज असते.

तुम्हाला जर लघवी करताना समस्या असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्या.

 

पिनवर्म-

कधीकधी पिनवर्ममुळे देखील मूत्रमार्गात बिघाड होऊ शकतो. ग्रीसमधील इलपाईस हॉस्पिटलमध्ये एका ६५ वर्षाच्या वृद्ध माणसाच्या प्रोस्टेड ग्रंथीमध्ये ४ मीमी चा जिंवत पिनवर्म मिळाला आहे.त्या माणसामध्ये लघवीला वारंवार होणे,लघवीला वेदना,सौम्य पाठदुखी व मूत्रमार्गात अस्वस्थता ही लक्षणे आढळली.तर तुर्कीमधल्या एका संशोधनात डिसूरिया मध्ये झालेल्या पिनवर्मसोबत अशी लक्षणे आढळली नाहीत.उलट या संशोधनात शाळेत जाणा-या मुलींनी पिनवर्म इनफेक्शन झाले असताना रात्री झोपेत अंथरुणात लघवी केल्याची उदाहरणे सापडली.

 

औषध-उपचार-

काही औषध-उपचारांमुळे देखील लघवीच्या समस्या निर्माण होतात.

 

 

हा विकार मूत्रमार्गातील एक संकर्मण आहे.यामध्ये मूत्रमार्गातील रोगजनकांच्या कमी पातळीमुळे,मूत्रमार्गातील बिघाडामुळे किंवा सॅनिटरी नॅपकिन,टेम्पोन अथवा संबंधांदरम्यान मूत्रमार्गात झालेल्या जखमेमुळे मूत्रमार्गात समस्या निर्माण होतात.

 

डिसूरियाची इतर काही कारणे-

मॅनोपॉजनंतर स्त्रीयांमध्ये इस्टोजनची पातळी कमी झाल्यामुळे मूत्रमार्गा्च्या समस्या होतात.मूत्रमार्ग कोरडा होणे,कधीकधी दाह होणे या समस्या सोबत डिसूरिया होण्याची शक्यता असते.

संबंधादरम्यान त्या भागात झालेली जखम.

एखादा स्प्रे,क्रीम,साबण,टॉयलेट पेपर सहन न होणे.

युरेथ्रल सर्जरी

घोड्यावर सवारी अथवा सायकलींग करणे

मनोविकार अथवा मानसिक व लैगिंक अत्याचार झालेली माणसे

सेक्शूली ट्रान्समिटेड इनफेक्शन

व्हजायनल यीस्ट इनफेक्शन

मूत्राशय व किडनीचे इनफेक्शन

किडनी स्टोन

डिसूरियावर काय उपाय करावेत-

मूत्रमार्गात कधीतरी होणा-या समस्येबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही.मात्र डिसूरियाची लक्षणे आढळल्यास किंवा दीर्घ काळ गंभीर वेदना होत असतील तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर  घ्या.

प्राथमिक चाचणी दरम्यान डॉक्टर या गोष्टी तपासतील-

 

लक्षणे

मूत्रमार्गातील इनफेक्शन

लघवीमध्ये रक्त असणे,वारंवार लघवी होणे

पोटदुखी व वजानल डिस्चार्ज

तुम्ही घेत असलेल्या अॅन्टीबायोटीक्स

घरात किडनीस्टोनचा त्रास अनेकांना असणं

या टेस्ट करण्यात येतात-

कॉस्टोव्हर्टेबल अॅगंल टेंडरनेस

मूत्रमार्गातील परिक्षण

पेल्विक परिक्षण

डॉक्टरांना संशय आल्यास करण्यासाठी इतर काही टेस्ट-

युरीन अॅनालिसिस व कल्चर

सेक्शूली टान्समिटेड इनफेक्शन स्क्रिनींग

लघवीमधील कॅल्शियम व क्रिएटीन

लघवीत रक्त सापडल्यास रिनल अल्ट्रा साउंड

पेल्विक अल्ट्रा साउंड

किडनी स्टोनसाठी सीटी स्कॅन

 

 

तुमच्या स्थितीनूसार डिसूरियावर अॅन्टीबायोटीक्स देण्यात येतात.यीस्ट इनफेक्शन असल्यास अॅन्टी फंगल औषधे किंवा योनीमार्गासाठी क्रीम देण्यात येतात.पेल्विक भागात गंभीर दाह होत असल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.

होमियोपॅथी

या आजारावर उत्कृष्ठ उपचार होमिओपॅथी मधे उपलब्ध आहेत

उदा:

सरसापरिला

कॅंथारिस

बर्बेरिस

सबाडिला ई.

dr. sonali sarnobat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.