कचरा भरून वाहणारे कचराकुंड आणिदुर्लक्ष करणारी महानगरपालिका हे चित्र फक्त आपल्या बेळगावात नव्हे तर संपूर्ण देशात आहे. यावर परिणामकारक ठरणारे यंत्र बेळगावच्या विद्यार्थ्याने तयार केले आहे, कचराकुंड भरला की त्याचा अलार्म मनपा कार्यालयात वाजतो. हे यंत्र घेऊन तो विध्यार्थी दिल्लीत पोचला, केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांना त्याने या यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
आयुष किरण तमन्नावर असे त्याचे नाव. येथील केंद्रीय विद्यालय क्र २ मध्ये तो सातवीत शिकतो आहे. त्याच्या या शोधाने केंद्रीय मंत्रीही प्रभावित झाले आहेत.