बेळगाव शहर आणि परिसर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीलाच रंगपंचमी साजरी करतो. हा उत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला युवक लहान मुले आणि वृद्धांनीही हा सण रंगाची उधळण करून साजरा केला.
सकाळपासून ते दुपारी दिड दोन पर्यंत रंगांचा हा सण सुरु होता, मोटारसायकली वरून दाखल होणारे तरुण आणि ठिकठिकाणी फवारे लावून नृत्य करणारे तरुण दिसून आले, त्यांचा उत्सव जोरदार होता
दुपारी पोलिसांनी रंग खेळणाऱ्या तरुणांना पिटाळण्याची वेळ आली होती.
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरास लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती