Sunday, April 28, 2024

/

माहेश्वरी अंध शाळेच्या विद्यार्थ्यासमवेत रंगपंचमी साजरी. जायंट्स मेन चा उपक्रम

 belgaum

Giants holi bgmबेळगाव:- ता.१३ जायंट्स मेन च्या वतीने या वर्षीची रंगपंचमी माहेश्वरी अंध शाळेच्या विद्यार्थ्यासमवेत साजरा केला.
अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी ता.१३ रोजी सकाळी ९-०० वाजता कोल्हापूर सर्कल येथील माहेश्वरी अंध शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावात सर्वच जण या उत्सवाचा आनंद घेतात, पण ज्यांनी हे जगच पहिले नाही, अशा विद्यार्थ्यासमवेत या वर्षीची रंगपंचमी खेळायची असा निर्णय जायंट्स मेन च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि त्याप्रमाणे हा आनंद साजरा केला.
याप्रसंगी अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, सुनील भोसले, सेक्रेटरी महादेव पाटील, खजिनदार अरुण काळे, मोहन कारेकर, डाँ विनोद गायकवाड, महेश शहापुरकर, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, भरत गावडे, मदन बामणे, सुनील मुरकुटे, दिगंबर किल्लेकर, महादेव केसरकर, यल्लापा पाटील, जगदीश जाधव, संजय शिवनगौडा पाटील, अजित कोकणे, सुनील मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, विकास कलघटगी, ईश्वर पाटील, अनिल चौगुले, पांडुरंग पालेकर, उपस्थित होते

 

बातमी सौजन्य  – महादेव पाटील

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.