बेळगाव दि 9-महा पालिका निवडणुकीत मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाल्याने फुगून तीळ पापड झालेल्या कन्नड संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी कन्नड महापौर करण्यात अपयशी ठरले आहेत यापुढे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हस्तक्षेप करावा तसेच सीमा प्रश्न प्रभारी मंत्री एच के पाटील यांचे अधिकार वाढवावेत अशी मागणी धरणे अंदोलन करणाऱ्या कन्नड संघटनाच्या म्होरक्यानी केली आहे . बेळगावात मराठी भाषिक नगर सेवकांच संख्याबळ अधिक आहे मराठ्यांचे प्राबल्य जास्त आहे हे आंदोलन करणा ऱ्या मूठभर कन्नड नेत्यांना कधी समजणार?