बेळगाव दि १७ -बेळगावात एक युवतीने रेल्वे ट्रॅकवर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.पहिल्या रेल्वे गेट नजीक हा थरारक प्रकार घडला असून पाहणाऱ्यांचे हात पाय अक्षरशः थरथरू लागले होते.
ती युवती नेमकी कोण आणि कुठून आली याचा तपास अद्याप लागला नाही. आजवर स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या घडल्या आहेत मात्र रेल्वे ट्रॅकवर पेटवून घेऊन स्वतःला सम्पविण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.स्वतःला पेटवून घेऊन तिने रेल्वेखाली उडी घेतली आहे असे प्रत्यक्षयदर्शींनी सांगितले.बेळगाव रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक माहिती नुसार सदर युवती महाविध्यालयीन विध्यार्थिनी असावी आणि घरघुती वादातून हा प्रकार झाल्या असल्याचा संशय घटना स्थळावरील लोक व्यक्त करताना दिसत होते .
Trending Now