बेळगाव दि २० : दिल्लीचा पैलवान कपिल धामा याने घुटना डावावर पुण्याचा पैलवान विलास डोईफोडे याला चीत करून पिरनवाडी येथील मैदान मारले. पिरनवाडी येथील शाह सदरोद्दिन अन्सारी उर्फ हजरत जंगली पीर उरूस निमित्य कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आल होत . ११५ किलोच्या कपिल धामा विरुद्ध १०५ किलो वजनाच्या विलास डोईफोडे याची प्रथम क्रमांकाची कुस्ती तब्बल १५ मिनिट चालली.
सोमवारी सायंकाळी पिरनवाडी येथील मैदानात आमदार संभाजी पाटील ,राजेंद्र मुतगेकर आणि माजी महापौर रेणू मुतगेकर ,उपमहापौर संजय शिंदे यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली . पिरनवाडी येथील कुस्ती मैदानात ४० कुस्त्या लावण्यात आल्या या मैदानात दिल्ली हरियाना पुणे जालना कोल्हपुर सांगली इचलकरंजी आणि बेळगावातील पैलवानांनी भाग घेतला होता. या कुस्त्यांना पंच म्हणून हनमंत गुरव तर सहयाक पंच म्हणून आपाजी मुतगेकर यांनी काम पहिले. शाह सदरोद्दिन अन्सारी उर्फ हजरत जंगली पीर उरूस कुस्ती कमिटीच्या वतीने या कुस्त्यांचं आयोजन केल होत . यावेळी संजय पाटील , सतीश पाटील ,संजय चौगुले महेश मुतगेकर , कुस्ती कमिटी सचिव मुक्तीयार बडेघरवाले, अन्सार हुबलीवाले आदी उपस्थित होते .