Friday, April 26, 2024

/

पंडित रामभाऊ विजापुरे जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

 belgaum

बेळगाव ,दि . २०-प्रख्यात संवादिनीवादक आणि गायक पंडित रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे . कन्नड संस्कृती खाते आणि सुरेल संवादिनी संवर्धन ,अकादमी ऑफ म्युझिक यांच्यातर्फे दि . २२ फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता संगीतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
संगीतसंध्या कार्यक्रमात डॉ . सुधांशु कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांची संवादिनी जुगलबंदी होणार आहे . डॉ . भारती वैशंपायन यांच्या गायनाचा कार्यक्रम देखील होणार आहे . त्यांना डॉ . रवींद्र कातोटी ,केदार वैशंपायन आणि अंगद देसाई साथसंगत करणार आहेत . शिरीष जोशी हे आपल्या भाषणातून पंडित रामभाऊ विजापुरेंचा जीवनप्रवास उलगडून दाखवणार आहेत . नीरजा गणाचारी या सूत्रसंचालन करणार आहेत .
पंडित रामभाऊ विजापूर यांनी पासष्ट वर्षे संगीत विद्यालय चालवून हजारो विद्यार्थी घडवले . देशातील सगळ्या दिग्गज कलाकारांना त्यांनी देशातील विविध ठिकाणी जाऊन साथसंगत केली आहे . त्यांचे विद्यार्थी डॉ.सुधांशु कुलकर्णी यांनी संवादिनीवर संशोधन करून पी एच डी केली आहे . त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज देशभरात अनेक ठिकाणी सांगीतिक सेवा करत आहेत . दि . २२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संगीतसंध्या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ . सुधांशु कुलकर्णी ,संगीत नृत्य अकादमीचे सदस्य राजप्रभू धोत्रे आणि सुनील देशपांडे यांनी केले आहे .

rambhau vijapure pandit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.