बेळगाव दि २३ : काकती युवती बलात्कार प्रकरणातील आरोपीवर कडक आरोप पत्र दाखल करा आणि पिडीतेच्या कुटुंबास सुरक्षा पुरवावी अशी मागणी समस्त स्त्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला संघटनेच्या नेतृत्वात समस्त स्त्री संघटनेने सदर मागणी केली आहे .
राज्य पोलीस महा संचालक ,राज्य महिला आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाना निवेदना द्वारे केली आहे . गुरुवारी समस्त स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने पोलीस उपायुक्त जी राधिका यांची भेट घेऊन सदर निवेदन देण्यात आले . हा खटला संपेपर्यंत पिडीत युवतीच्या कुटुंबाला पोलीस सुरक्षा देण्यात यावी याच्या शिवाय राजकीय लोकांचा दबाव या केस मध्ये येऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे .जांबोटी राकसकोप ,काकती आदी भागात पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे अस महिला संघटनेन निवेदनात म्हटल आहे . यावेळी अंजलीताई गाडगीळ, मनीषा सुभेदार ,प्रमोद हजारे ,माधुरी नेवगीरी , मंगला नंदीहल्ली,आरती रायकर ,उल्फत रंगरेज,मंदा नेवगी आदी उपस्थित होत्या
विध्यार्थ्यानी धर्मवीर संभाजी चौकात निषेध
गुरुवारी सायंकाळी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी ध्या अशी मागणी करत निषेध आंदोलन करण्यात आल . संभाजी चौकात फोटो फलक हातात घेऊन युवका विध्यार्थी एकत्रित होऊन हे आंदोलन केल