बेळगाव दि ११ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी साहाय्य ठरलेली शांताई वृद्धाश्रमाची विद्याआधार आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठीची माणुसकीची भिंत या योजनांना बेळगावकर नागरिक उदंड प्रतिसाद देत आहेत.
घरातील टाकाऊ रद्दी तसेच इतर साहित्य आणून देऊन लोक साथ देऊ लागले आहेत.
या दोन्ही योजना सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. आजवर ३५० विध्यार्थ्यांना १७.५० लाखांची रद्दी विकून साहाय्य करण्यात आले आहे.
मदतकर्त्यांनी ९८४४२६८६८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Trending Now