Sunday, September 1, 2024

/

जॉली एल एल बी भाग २ ची जादू

 belgaum

बेळगाव दि ११ : अक्षय कुमार अभिनित जॉली एल एल बी भाग २ हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित झाला आहे. येथील अद्ययावत स्वरूप नर्तकी चित्रपटात हा चित्रपट हाऊसफुल गर्दीत सुरु आहे. चित्रपटगृहाचे मालक अविनाश पोतदार यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे चित्रपटगृह त्यातील मॉडर्न लुक ने नागरिकांच्या आवडीचे ठरत आहे. यामुळेच हा चित्रपट हिट होऊ लागला आहे.
नवोदित वकिलाची ही कथा आहे. चांगले नाव कमावण्यासाठी त्याची धडपड सुरू असते, यातच एका अन्यायग्रस्त महिलेचा तो अपराधी ठरतो. तिच्या आत्महत्येचे कारण आपण बनलोय ही बाब त्याला सतावते.
आणि तिच्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी जनहित याचिकेच्या माध्यमातून त्याचे प्रयत्न सुरु होतात. तिला न्याय देण्यासाठी जॉली काय काय करतो हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट गृहातच जावे लागेल.
जास्तीतजास्त मंडळींनी चित्रपटाचा आनंद हा चित्रपट गृहात जाऊन लुटावा ही गरज आहे. यासाठी बेळगाव लाइव्ह विशेष प्रयत्न करणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.