बेळगाव दि २४:संकेश्वर पासून केवळ २ कि मी दूर असलेल्या या वल्लभगडाबद्दल एक आख्यायिका आहे. एकदा भगवान शंकर व जगन्माता माता पार्वती यांच्यात भांडण झाले. पार्वती रागावून निघाल्या व या वल्लभगड पर्वतावर येऊन लपून बसल्या. विरहव्याकुळ भगवान शंकर माता पार्वतीचा शोध घेत असता या पर्वतावर रुसून बसलेल्या त्यांना आढळल्या. तिची समजूत काढण्यासाठी तेही तेथेच राहिले. त्यामुळे या गडाला ’पार्वतीवल्लभाचा गड’ असे नाव पडले. कालांतराने ’पार्वती’ या शब्दाचा लोप होऊन ’वल्लभगड’ असे नाव रुढ झाले.
हरिद्रा मंदिर
हरिद्रा मंदिर हे शके १८१४ मध्ये बांधलेले आहे
हरिद्रा हे जगन्माता पार्वतीचेच रूप आहे.
जगन्माता पार्वतीचे या वल्लभगड पर्वतावर वस्तव्य होते म्हणून या ठीकाणी या हरिद्रा देवीचे मंदिर बांदले आहे.
व या वल्लभगड पर्वतावर भगवान शंकरांचे वस्तव्य होते म्हणून किल्याच्या माथ्यावर महादेव मंदिर देखील याच वेळी बांधलेले आहे
माहिती सौजन्य :गजानन साळुंखे