Sunday, May 19, 2024

/

वडगाव शेतवाडीतील पिकाऊ जमिनीतील ड्रेनेजच काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं

 belgaum

बेळगाव दि ६ : येळ्ळूर रोड के एल ई च्या सांड पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महा पालिकेच्या वतीने  वडगाव अनगोळ येळ्ळूर रोड आणि यरमाळ रोड मधील शेतवाडीतून काढण्यात येणारी ड्रेनेज पाइप लाईन चे काम वडगाव भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद पाडलं.

महा पालिकेच्या वतीने अधिकारी मुत्तेन्नावर यांना  शेतकऱ्यांनी अडवून जाब विचारला आणि ड्रेनेज पाईप लाईन खुदाईचे काम बंद पाडलं . पालिकेने जे सी बी आणि पोकलंड द्वारे ड्रेनेज खुदाई काम सुरु होते त्यावेळी शती बचाव समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी आंदोलन करत काम बंद पाडलं यावेळी मनपा अधिकारी मुत्तेनान्नावरआणि ठेकेदार धामणेकर यांना जाब विचारला यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर दूरध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली . पिकाऊ जमिनीतून नवीन खुदाई करण्या एवजी जुन्या ड्रेनेज मधून पाणी सोडा अशी मागणी निप्पाणीकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी पालिका अभियंत्यांनी आश्वासन दिल्या नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले . यावेळी शेती बचाव समिती बलराम पोटे. सुभाष लाड देविदास चव्हाण पाटील, राजू मर्वे अमृत भाकोजी सतीश गावडोजी आदी शेतकऱ्यांनी उपस्थित होते

vadgaan farmers protest

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.