बेळगाव दि ६ : सर्व मराठ्यांनी पक्ष भेद विसरून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकीने प्रयत्न करणे जरुरीचं आहे असं मत काँग्रेस नेते आणि माजी बुडा अध्यक्ष आणि विध्यमान ए पी एम सी सदस्य युवराज कदम यांनी व्यक्त केलं आहे .
रविवारी रात्री उचगाव येथे मळेकरणी देवीच्या आवारात मराठा मोर्चा जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी मदन बामणे ,मनोश पावशे ,शिवाजी सुंठकर, भागोजी पाटील ,गुणवंत पाटील , महादेव पाटील ,संदीप पाटील , सुनील जाधव , नारायण सावंत आदी उपस्थित होते . सीमा भागातील मराठा विखुरट कामाये या साठी सर्वानी पक्ष भेद विसरून सरकार दरबारी मराठ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करूयात असं देखील युवराज कदम म्हणाले .उचगाव भागातून हजारोच्या संख्येने मराठा क्रांती जण सामील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
Trending Now
/