Sunday, December 22, 2024

/

माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला, प्रशांत बी के मॉडेल शाळा

 belgaum

मी प्रशांत, माझ्या आई वडिलांचा एकुलता मुलगा. माझी ताई आणि मी दोघेही शाळेला जायचो. माझं स्वप्न होतं मोठा माणूस व्हायचं आणि काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या आई बापाला सुखात ठेवायचं. खूपखूप अपेक्षा होत्या माझ्या. सगळ्याचा शेवट झाला हो, मला मारणारे माझ्याच शाळेतले, दादागिरी करण्याच्या नादात ते बेभान होते, त्यांनी मला संपविले, त्यांच्या त्या विकृतीत फक्त मी संपलो नाही तर माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला…
आजकाल माझ्या वयाच्या मुलांना सगळं सोप्प झालय, काहीही मिळवणं अवघड नाही आणि काहीही करून हिरो व्हायची वृत्ती आहे ते माझे तीन मित्र आणि त्यांचे साथीदार मला मैदानात लोळवत होते तेंव्हा माझी अवस्था वाईट होती, मी एकटा आणि ते बरेच, चिडवायची आडवायची आणि पाडवायची त्यांची विकृती, माझ्या जीवावर उठलेल्या त्यांना मी अजूनही मित्रच मानतो, कारण मी त्यांच्या चुकीच्या वर्तनाने रागावलो नाही, त्यांना आपण बालके आहोत याचा विसर पडला होता, त्यांच्यातला राक्षस बाहेर पडला होता, असा राक्षस माझ्या वयातल्या कुणाच्याही मनात वाढू नये म्हणून आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे.
मी तळमळलो, मग माझा जीव बाहेर पडला , धावपळ झाली, मी बघत होतो काहीजण माझ्या मृत्यूचे कारण दडपत होते, मात्र सत्य बाहेर आलेच, त्यांना बालसुधार घरात पाठवणार म्हणे, तेथे त्यांचे मोठे गुंड होऊ नयेत याची काळजी घ्या, कुठल्याही शाळेत आदर्श विध्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, नाही झाले, यापुढे व्हावेत अशी आशा आहे, माझ्या मृत्यूचे दुःख होईलच, त्यातून सुधारणा घडावी हीच इच्छा !
नमस्कार
रामराम

काहीही चूक नसताना जीवाला मुकलेला प्रशांतstudent death in ground

2 COMMENTS

  1. माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला,
    मस्त आर्टिकल ,
    काल बी के मॉडेल हायस्कुलचा विद्यार्थी प्रशांत मृतावस्थेत आढळला , आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला, हे जे मनोगत लिहिलंय अप्रतिम,

  2. Its an awful truth of today.. we gave them smart phones, expensive toys, and probably everything that we could not even afford yet we are failing to create good human beings.. its time that all parents need to introspect and afford spending some quality time with your little ones.. We need to understand that Smart phones and all worldly pleasure cannot compensate the company of parents..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.