बेळगाव दि ९ : बुधवारी सायंकाळी बी के मॉडेल शाळेच्या मैदानावर मृतावस्थेत आढळलेला त्याच शाळेचा विद्यार्थी प्रशांत हुलमनी याचा त्याच शाळेतील तिघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जननेंद्रियावर लाथांनी प्रहार करून त्याला संपविण्यात आले आहे. याची माहिती शाळेच्या शिक्षकांना होती. मात्र त्यांनी प्रकरण दडपण्याचा मोठा प्रयत्न केल्याची माहितीही उघड झाली आहे.
त्या तिन्ही मुलांनी क्षुल्लक कारणावरून वाद वाढवीत मारहाण केली आहे. बालगुन्हेगारी कायद्यांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान शाळेतील वादातून खून हा धक्कादायक आणि घातकी प्रकार बेळगावात घडल्याने समाजात दिवसभर त्याची जोरदार चर्चा सुरु होती. टीव्ही आणि सिनेमा पाहून आजकाल शाळकरी मुलेही क्रूर आणि विकृत बनत चालली आहेत. पालक आणि शिक्षकांची भूमिका यात महत्वाची आहे. आपापली मुले या प्रकारच्या गुन्हेगारी प्रकारात गुंतू नयेत म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याकडे लक्ष ध्याव लागेल