बेळगाव दि २४: दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरात महा शिव रात्री निमित्य हजारो भावीकांनी शिव दर्शन साठी मोठी गर्दी केलीय
महा शिव रात्री निमित्य कपिलेश्वर मंदिरात पहाटे शिव लिंग अभिषेक करण्यात आला होता. शिवरात्री निमित्य शुक्रवारी शिव दर्शन साठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी मंदिरापासून रेणुका हॉटेल पर्यंत गर्दी झाली होती . बेळगाव सह गोवा कोल्हापूर हुबळी भागातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले कपिलेश्वर मंदिर हे खूप जून शिव मंदिर आहे याला वेगळाच इतिहास आहे. आज ही बेळगाव भागातील कोणी भावीक जर का काशी, रामेश्वर भेट देऊन आले तर कपिलेश्वर मंदिराला भेट दिल्या शिवाय घरी जात नाहीत अशी परंपरा आहे. कपिलेश्वर व्यतिरिक्त कॅम्प शिव मंदिर ,कणबर्गी सिद्धेश्वर दर्शनासाठी` मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे .
कपिलेश्वर मंदिरात पाणी वाटप
उन्हाचा तडका पाहता आम्ही बेळगावकर संघाच्या वतीने कपिलेश्वर मंदिर जवळ उपस्थित राहून दिवसभर पाण्याची सोय केली करण्यात आली होती सकाळी 10 ते 5 या वेळेत आम्ही बेळगावकर मराठी संघातर्फे हा उपक्रम केला .