Saturday, September 7, 2024

/

बुधवारी अटक केलेल्या शार्प शुटरना १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

 belgaum

बेळगाव दि २ : बुधवारी सायंकाळी सिनेमा स्टाइल ने  बेळगाव पोलिसांनी जेरबंद केलेल्या सहा शार्प शुटर्स ना बेळगाव न्यायालायान १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

बुधवारी पोलिसांनी सहा आंतर राज्य अट्टल अश्या शार्प शुटर न अटक करून त्यांच्या कडून ५ पिस्तुल जिवंत काडतूस आणि मुद्देमाल जप्त केला होता त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलिसानी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल त्यानंतर न्यायलयान त्यांना १८ फेब्रुवारी पोलीस कोठडी सुनावली आहे . आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करून तपास करणार आहेत . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या व्यक्तींनी हिंडलगा कारागृहात वकिलाच्या हत्येप्रकरणी आरोप असलेल्या दिनकर शेट्टी याला जेलमधून बाहेर काढण्याची सुपारी घेतली होती . दिनकर शेट्टीची कारागृहातून सुटका करण्याची सुपारी शार्प शुटरना कोणी दिली याचा तपास करणार आहेत या शिवाय या केस ची पाळेमूळ कुठ पर्यंत आहेत याचा देखील मागोवा पोलीस घेणार असल्याचे समजते

sharp shooters arrest bgm

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.