बेळगाव दि ४ : नाराजी मूळ कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एस एम कृष्णा यांची नाराजी दूर करण्यासाठी निष्ठावंत कॉंग्रेस चे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. नुकताच पक्ष श्रेष्ठी आणि कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे कृष्णा यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
बेळगावातील कॉंग्रेस नेते शंकर मूनवळळी यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते बंगलोर येथील कृष्णा यांच्या निवास स्थाना समोर धरणे आंदोलन करणार आहेत . या संदर्भात बेळगावात सोमवारी ६ फेब्रुवारी बैठक घेण्यात येणार असून बुधवारी फेब्रुवारी ८ बंगलोर मध्ये ३०० हून अधिक कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत . कॉंग्रेस नेते शंकर मुनवळळी यांनी शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केल की मंत्री रमेश कुमार आणि दिनेश गुंडूराव यांना कृष्ण यांच्या बद्दल बोलायचं नैतिक अधिकार नाही आहे हे दोघे मंत्री या पक्षाचे अध्यक्ष नाहीत त्यामुळे आम्ही कृष्णा यंची मनधरणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले . एस एम कृष्णा हे मैसूर बेल्ट मधले ओक्कालीगा समाजाचे मोठे मोठे नेते असून या भागात त्याचं प्रस्थ आहे बंगलोर शहराचा विकास व्हायला कृष्णा कारणीभूत आहेत त्यामुळे कृष्णा यांची अनुपस्थिती कॉंग्रेस ला जाणवणार आहे