Saturday, November 16, 2024

/

बेळगावात सोशल मिडीयावर राज ठाकरेंची उडवली जातेय खिल्ली

 belgaum

बेळगाव दि २४ : मुंबई महा पालिका निवडणुकीत फक्त सात जागा मिळाल्याने मनसे ला शेवटची घरघर लागली आहे हे सर्वश्रुत आहे . बेळगाव सीमा प्रश्नी राज ठाकरे अनेकदा विरोधात वक्तव्य केली आहेत त्यामुळे सध्या राज  ठाकरे यांच्या मनसे पक्ष बड पच मध्ये जाताना दिसत आहे. असे  असताना बेळगावातील युवक कार्यकर्ते राज ठाकरे यांची सोशल मिडीयावर खिल्ली उडवताना दिसत आहेत .

सध्या मुंबई महा पालिकेच्या निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांची झालेली गोची सर्वश्रुत आहे त्यांचा मनसे पक्षाला अत्यंत वाईट दिवस आले आहेत . त्याला अनेक कारणे कारणीभूत असतीलही मात्र गेल्या चार पाच वर्षापूर्वी बेळगाव प्रश्नी राज ठाकरे यांनी  बेळगाव सीमा प्रश्नी जाहीर केलेली आपली भूमिका त्यामुळे त्यांना सीमा भागात प्रचंड रोषाला समोर जावे लागले होते.  त्या तुलनेत शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेने बद्दल बेळगावातील मराठी माणसात प्रचंड आदराची भावना आहे . सध्य स्थितीत राज ठाकरे यांच्या विषयी बेळगाव प्रश्नी विरोधात भूमिका घेतल्याने अनेक मराठी युवक फेसबुक व्हाटस अप्प ट्विटर आणि अन्य सोशल मिडीयावर राज ठाकरे यांची फिरकी घेत आहेत.तस राज ठाकरे यांनी आपली भूमिका शिवसेनेला कमी लेखण्यासाठी भाजपला खुश करण्यासाठी तत्कालीन भाजपा अध्यक्षांच्या सांगण्या वरून घेतली असावी त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी राज ठाकरे यांचा विडीओ दाखवून मराठी युवकांना मारहाण केली होती त्यामुळे  बेळगावातील मराठी माणसाच्या मनात राज यांच्या विषयी आणि त्यांच्या भुमिके विषयी अत्यंत चीड आहे . मराठीचा मुद्दा पुढे करून मोठ झालेल्या मनसे पक्षाला भविष्यात राजकारण करायचं असेल तर बेळगावप्रश्ना विषयी पाठिंब्याची भूमिका घेणे आणि सीमा वासीयांची माफी मागणेच योग्य ठरेल अस जाणकारांच मत आहे .

राज ठाकरेला सीमावासीयांचा तळतळाट लागला – महादेव पाटील

सोशल मिडीयावर सतत कार्यशील असणारे महादेव पाटील यांनी वेगळ्या शब्दात राज ठाकरे यांची खिल्ली  उडवली असून बेळगावातील मराठी माणसाचा तळतळा लागली अशी भूमिका मांडली आहे

राज ठाकरेंची मुलाखत 2012 साली मुंबईत झाली, आणि त्या मुलाखतीत राज ठाकरे बोलून गेले, जर कर्नाटकात राजयोत्सव असताना काळा दिन पाळत असतील तर एकेकट्याच्या पाठी फोडून काढिन, जिथे आहांत तिथे मुकाट्याने रहा म्हणून सीमावासीयांना उपरोधिक सल्ला दिला होता ,

आमच्या पाठीची साल सोलणारे राज ठाकरे कोण ?

अरे ये हिम्मत असेल तर बेळगावात आणि बोल, कुणाची पाठ फुटते ते बघूया,
गेली 61 वर्षे या कर्नाटकचे पोलीस आमच्या पाठी फोडताहेत, खरं स्वाभिमानाने आजचा तरुण बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेपासून तसूभरही मागे हटला नाही, आणि तू कोण आम्हाला सांगणारा तीसमाररखान,

इथे ये आणि विचार ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्याने आणि पोलिसाने सीमावासीयांच्या पाठी आणि ढुगणे फोडली त्याचे हात सडलेत कि नाही?

आणि म्हणूनच सीमावासीयांचा तुला तळतळाट लागला ,आणि महाराष्ट्रातून रेल्वे इंजिन हद्दपार झाले. यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे स्वाभिमानी सीमावासीयांच्या वतीने त्रिवार अभिनंदन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

raj thakre belgaum social media

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.