बेळगाव दि २१ : प्रियकरा सोबत गार्डन मध्ये फिरायला गेलेल्या एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वर पाच जणांनी प्रियकरा समक्ष सामूहिक बलात्कार केल्याची घटना बेळगावात घडली आहे . याप्रकरणी काकती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा तपास करत आहेत .
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार बेळगावातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आपल्या प्रियकरा सह भुतरामहट्टी येथील गार्डन मध्ये फिरायला गेली असता पाच जणांनी तब्बल या युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे . सदर युवतीला उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आणि अधिक तपास करत आहेत . पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी घटना स्थळी आणि इस्पितळात जाऊन पीडित युवतीची भेट घेऊन चौकशी केली .अश्या निर्जन स्थळी युवतींनी फिरणे टाळायला हवेत तेंव्हाच अश्या घटना कमी होतील अस बोलल जातआहे
Trending Now