Thursday, December 26, 2024

/

एकीच्या बळावर प्रश्नाचा सोक्षमोक्ष : दीपक दळवी

 belgaum

बेळगाव दि ७ : जनतेच्या एकीच्या बळावर नजिकच्या काळात सीमा प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही ,असे ठाम प्रतिपादन दीपक दळवी यांनी केले, ते पिरनवाडी येथे आयोजित केलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकित बोलत होते.
अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचंडीकर होते. व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणयेकर,माजी . उपमहापौर रेणू मुतकेकर, नगरसेविका रुपा नेसरकर, नुतन एपीएमसी सदस्य आर के पाटील, महेश जुवेकर होते.
यावेळी बोलताना किनेकर म्हणाले की आपण सर्वजण शिस्त पाळणे खुप महत्वाचे आहे. कारण हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. उपमहापौर रेणू मुतकेकर म्हणाल्या कर्नाटकात शहाजी राजांची समाधी उपेक्षित आहे, या सकल मराठा मोर्चाच्या माध्यमातून सध्या मराठी समाजाला मिळणाऱ्या  आरक्षणात बदल करुन घेणे खुप गरजेचे आहे, त्यासाठी आपण साऱ्यानी मिळून हा मोर्चा यशस्वी करूया. यावेळी नुतन एपीएमसी सदस्य आर के पाटील यांनी ,वाघवडे पिरनवाडी ,खादरवाडी गावचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.