बेळगाव दि १४: अर्थसंकल्पात पोस्टकार्यालयात पासपोर्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे फक्त अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी हुबळी येथेच जावे लागेल, यासाठी मंजुरी प्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या माजी अध्यक्ष फोरम ने महापौर सरिता पाटील यांच्याकडे केली आहे.
फोरम चे सतीश तेंडोलकर, बसवराज जवळी, सेवांतीलाल शाह व विकास कलघटगी यांनी महापौरांची भेट घेतली. पासपोर्ट सेवा केंद्रांसाठीच्या शहरांच्या यादीत बेळगावचा समावेश करण्यात आला आहे, मनपाने जागाही उपलब्ध केली आहे. यासाठी आवश्यक पत्रव्यवहार करावा असे निवेदन त्यांना देण्यात आले.
महा पालिकेने पासपोर्ट केंद्रासाठी गोवा वेस जवळ जागा मंजूर केली आहे त्याची ठरावाची प्रत लवकरच विदेश मंत्रालयाला पाठविण्यात येणार असून संपर्क करून कायम स्वरूपी पास पोर्ट केंद्र करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सरिता पाटील यांनी दिली