बेळगाव दि २७:बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी शहरांच्या यादीत समावेश झाला असला तरी कर्नाटक राज्य शासनाकडून अजूनही बेळगाव शहराला सापत्नुकीची वागणूक दिली जात आहे .
जे एम नर्म योजने अंतर्गत शहराला ५० नवीन बस मंजूर झाल्या आहेत गेल्या मे महिन्यापासून २०१७ जानेवारी पर्यंत परिवाहन विभागान ४३ नवीन बस दिल्या आहेत. हुबळी धारवाड येथील राज्य परिवाहन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून सात नवीन बस येणे अपेक्षित होते नवीन बस अध्याप पोचल्या नाहीत मात्र नवीन एवजी धारवाड हुबळी शहरातील जुन्या सात बस बेळगाव शहराला पाठविण्यात आल्या आहेत. या सात जुन्या बस पैकी २ हुबळी तर ५ धारवाड सिटी डेपोच्या गाड्या आहेत.
के ए २५ एफ ३२२५ ही हुबळी डिविजनची सध्या दुसऱ्या ट्रायल ची बस हुंचेनटटी बेळगाव भागात सुरु आहे तर आणखी एक के ए २५ एफ ३१९६ दुसरी हुबळी डिविजन ची बस आहे धारवाड डिविजन च्या पाच बस नी एका लाखाहून अधिक अंतर कापलेल असून त्यांचे नंबर के ए २५ एफ ३२५० ते ३२५४ असे आहेत .
नवीन निधी मंजूर झाला असताना बेळगाव शहराला तुम्ही जुन्या बस का पाठवता असा प्रश्न सोशल मिडीयावर उत्तर कर्नाटक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाऊ लागला आहे . हुबळी धारवाड विभागाला जे एन नर्म योजने अंतर्गत १२० नवीन बस मिळाल्या आहेत जन संपर्क नगर सारीगे ,ग्रीन लीवरी साठी वापरण्या एवजी अधिकारी हुबळी धारवाड सिटी बस म्हणून यांचा वापर सुरु आहे . ५० नवीन बस मंजूर झाल्या तर ५० बस दिल्या पाहिजेत फक्त ४३ नवीन आणि ७ जुन्या बस दिल्या जातात बेळगाव शहराला अजूनही सापत्नुकीची वागणूक का दिली जाते असा प्रश्न प्रवाश्यातून विचारला जातोय.