बेळगाव दि ११ :पाण्यावर काठी मारली तरी पाणी पुन्हा शिथल होतंय त्याच प्रमाणे बेळगावातील मराठा आणि मुस्लीम एकजुटीची क्रांती व्हावी. गरिबांच महाबळेश्वर असलेल्या या शहरात कायम स्वरूपी शांती नांदावी यासाठीच मराठा मोर्चास पाठींबा देत आहोत अस मत सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद यांनी बेळगाव लाईव्ह शी व्यक्त केल आहे .
साजिद सय्यद हे काकतीवेस येथील रहिवासी असून मुस्लीम समाजासाठी अनेक सामाजिक कार्ये त्यांनी केलेली आहेत . गेल्या काही महिन्यात कोल्हापूर येथील मराठा मोर्चात त्यांनी सहभाग दर्शविला होता तेंव्हा पासूनच त्यांनी बेळगावातील मराठा मोर्चात देखील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा यासाठी काम सुरु केल होत. कोल्हापुरात ज्या प्रमाणे मराठा आणि मुस्लीम समाज एकत्रित रित्या नांदतो त्याच प्रमाणे बेळगावात देखील मुस्लीम मराठी एकता दिसावी या साठी ते प्रयत्नशील आहेत . एकीचा संदेश घेऊन वेगवगळ्या संघटनाशी बोललो आणि मोर्चास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याच देखील सय्यद म्हणाले .
पाण्याला रंग असत नाही तसं प्रेमाला ही रंग असू नये पाणी कस पवित्र आणि शुद्ध असत तास आपल प्रेम देखील शुद्ध असुदेत या सारखंच दोन्ही समाजातील मैत्री अखंड राहूदेत मोर्चा नंतर देखील शहरातीलसुख शांती आणि समाधान टिकविण्यसाठी याचा उपयोग व्हावा ही भावना त्यांनी व्यक्त केली.