Thursday, May 23, 2024

/

क्रांती मोर्चात मुस्लीम संघटना करणार ५० हून अधिक ठिकाणी पाणी वाटप

 belgaum

बेळगाव दि ११ : बेळगाव शहरातील विविध मुस्लीम संघटनांच्या वतीने एक मराठा लाख मराठा क्रांती मोर्चात रुग्णाहिका सेवे सह  पिण्याचे पाणी वाटप करणार आहेत . जमात ए इस्लाम, सोलीडेतरी युवा मोमेंट, काकर गल्ली जमात सदस्य सह विविध मुस्लीम संघटनानी ही जबाबदारी घेतली आहे . शनिवारी दुपारी क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयात या सगळ्या संघटनेच्या पदाधिकार्यानी आपला पाठिंबा व्यक्त करत विविध सेवा बजावणार असल्याचे पत्र महापौर सरिता पाटील आणि मुख्य संयोजकाकडे दिल .

जमात ए इस्लाम संघटनेच्या वतीने डॉक्टर सह चार रुग्णवाहिका मोर्चा दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत या शिवाय बेळगाव शहरच्या इंडाल जवळ , न्यू गांधी नगर , त्रिवेणी चौक कॅम्प , बस स्थानक, सन्मान हॉटेल, काकतीवेस रोड अश्या ५० हून अधिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे वाटप करणार असल्याचे जाहीर केल . यावेळी जमात ए इस्लामचे जिल्हा  संघटक यासीन मकानदार , सोलीडेतरी युवा मोमेंट जिल्हा अध्यक्ष समीर अहमद, सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद, हमीद बारगीर ,काकर गल्ली जमात सदस्य खताल अहमद, समीर अहमद , खंजर गल्ली असद खान सोसायटी सद्दरोदिन मुल्ला ,खडे बाजारचे जावेद मुल्ला यावेळी उपस्थित होते . मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेचे नारायण सावंत यांनी विशेष पुढाकार घेतला होता .यावेळी मोर्चा संघटक प्रकाश मरगाळे मनोहर किणेकर, टी के पाटील , दीपक दळवी ,राजेंद्र मुतगेकर , अमित देसाई ,महादेव चौगुले, पियुष हावळ ,प्रकाश बापू पाटील मोहन कारेकर, संजय मोरे ,रवी निर्मळकर आदी उपस्थित होते  muslim organisations supports maratha morcha

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.