Friday, December 27, 2024

/

क्रांती मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे यांची चौकशी

 belgaum

बेळगाव दि ११ : बेळगावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा आडकाठी घालण्याच काम पोलिसांनी चालूच ठेवल आहे . शुक्रवारी बेळगाव महाराष्ट्राचे असा उल्लेख असलेले टी शर्ट विकणाऱ्या युवकास अटक केल्या नंतर  खडे बाजार पोलिसांनी मोर्चा मुख्य संयोजक प्रकाश मरगाळे यांची चौकशी केली

शनिवारी सकाळी खडे बाजार पोलीस निरीक्षक यु ए सातेनहळळी यांनी  मरगाळे यांना ताब्यात घेतल होत मात्र सर्व आयोजकांनी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी करणार तर सगळयांची चौकशी करा अन्यथा अटक करा अश भूमिका घेतल्यावर त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले. एकीकडे ८ आयोजकांना शांतता भंग होऊ नये दोन भाषिकात तेढ निर्माण होऊ शकते अशी कलम १०७ नुसार नोटीस दिल्या नंतर पोलिसांनी शनिवारी पुन्हा चौकशी करून आयोजकांना त्रास देण्याच प्रयत्न चालविले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.