बेळगाव दि १७ : महापौर उपमहापौरांची मुदत संपल्याने बेळगाव महा पालिकेची निवडणूक १ मार्च रोजी होणार आहे .महापौर पद मागास वर्गीय अ महिला तर उपमहापौर पद सामान्य आहे . १ मार्च रोजी सकाळी १० वाजता बेळगाव पालिकेच्या महापौर उपमहापौराची निवडणूक प्रद्षिक आयुक्त एन जयराम यांनी जाहीर केली आहे .
एकेकाळी बेळगाव मराठी अस्मितेचे केंद्र बिंदू समजल जाणार मात्र काही वर्षात विकासाच्या नावाखाली मराठी अस्मितेला बाजूला सारलेल्या मराठी नगरसेवकांकडे सध्या सत्ता असली तरी सत्ताधारी गटात सध्या फुट पडली आहे त्यामुळे मराठी भाषिक महापौर होईल का याकडे सर्वाच लक्ष लागल आहे . दोन्ही गटा कडून मोर्चे बांधणी सुरु असून सत्ताधारी गटातला फुटीर गट काय भूमिका घेतो यावर बेळगाव चा कौन बनेगा महापौर हे ठरणार आहे
Trending Now