.
बेळगाव दि १४ :मराठी आणि मराठा क्रांती मोर्चात आचार संहितेच तंतोतंत पालन व्हाव यासाठी महिला आघाडी आणि जत्ती मठ कृती समितीने एक वेगळा आदर्श सगळ्या समोर ठेवला आहे . बेळगाव लाइव्ह ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजिटल फलकावरील आपल नाव आणि फोटो हटवून दुसरे फलक लावल्याने आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत.
सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चासाठी शहर भगवमयशिव मय झाल पाहिजेत यासाठी घाई गडबडीत महिला आघाडी आणि जत्ती मठ कृती समितीने फलकावर आपल नाव आणि फोटो छापले होते आम्ही दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यांनी या ठिकाणी वयक्तिक नाव फोटो नसलेले दुसरे फलक उभारून शहर समोर आदर्श घालून दिलाय . वास्तविक रित्या अनेक लोकप्रतिनिधी आणि संस्था संघटनानी आपले वयक्तिक फोटो नाव घालून फलक प्रिंट करणार होते मात्र बेळगाव लाईव्ह नी आचार संहितेच्या बद्दल आवाहन केल्या नंतर सर्व फलकावर वयक्तिक नाव आणि फोटो छापणे बंद केल आहे .
बेळगावातील सकल मराठा समाज मूक मोर्चात देखील ‘शिस्त आणि आचारसंहितेचे ‘काटेकोरपणे पालन. करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे नावातच ‘सकल’ आल्यामुळे इथं कुणाचं नेतृत्व नाही. कि कुणाच्या प्रचाराचे आणि व्यक्ती अथवा पक्षाचा स्तोम माजवण्याचे हे व्यासपीठ न्हवे. बेळगावात हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत कुठंही काडीचेही गालबोट लागू नये ही समस्त सकल मराठा समाजाची इच्छा आहे. सगळ्या बरोबर संयोजकांनी देखील आचार संहिता पाळावी अशी मागणी होत आहे .