बेळगाव दि २० : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा लाच प्रकरणात अटक होऊन दहा दिवसांचा कारावास झाला असला तरी पदभार न सोडल्याने संतप्त ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत कार्यालयास टाळे ठोकल.
सोमवारी दुपारी मच्छे सदस्यांनी ग्राम अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद पद सोडाव या मागणी साठी ठिय्या आंदोलन केल. मच्छे अध्यक्षा हुडेद यांना एन्टी करप्शन ब्युरो यांनी चार हजाराची लाच घेताना रंगे हात पकडून दहा दिवस कारागृहात रवानगी केली होती. अस असताना देखील हुडेद अजूनही अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत आहेत . लोकनियुक्त प्रतिनिधीला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली के सी एस आर कायद्यानुसार ४८ तासाहून अधिक काळ जर कारावास झाला तर त्या नियुक्त निलंबित केल जात तरी देखील हुडेद कारभार सांभाळत आहेत असा आरोप विरोधी पक्षातील ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे . आपल राजकीय वजन वापरून अध्याप त्या अध्यक्ष पद सोडायला तयार नाही अस देखील मच्छे येथील सदस्यांचा आरोप आहे .