बेळगाव दि २६: सीमाप्रश्न संदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या दि.१० मार्च रोजी सुनावणी होत आहे.या पार्श्वभुमीवर रविवारी कोल्हापुर येथे दुपारी सीमाप्रश्न समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी मागील सुनावणी वेळी झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.तसेच पुढील सुनावनीत महाराष्ट्र सरकार कडुन अपेक्षित कामकाजाच्या सुचना सीमावासीयांच्या वतीने देण्यात आल्या.यावेळी जेष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील,आमदार अरविंद पाटील,माजी आम. मनोहर किणेकर,दिगंबर पाटील,मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार,राजाभाऊ पाटील,प्रकाश मरगाळे, जयराम मिरजकर,दिनेश ओऊळकर हे सदस्य उपस्थित होते.