बेळगाव दि २६: मराठी नगरसेवकांत पडलेले दोन गट एकत्रित होण्यास दबाव वाढत असला तरी दुसरीकडे आमदार फिरोज सेठ यांनी कन्नड भाषिक महापौर करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. रविवारी सकाळी कन्नड आणि उर्दू गटातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली यावेळी माजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी देखील बैठकीस उपस्थित होते.
जर का पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगावात कन्नड भाषिक महापौर करण्यास बैठकीला बोलावले तर बैठकीस जाऊ आणि निश्चित कन्नड भाषिक महापौर करू असा विश्वास यावेळी जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांनी कोणत्याही परिस्थितीत या वर्षी कन्नड भाषिक महापौर करणार असल्याच वक्तव्य करत नगरसेवक मीना रायमन वाझ यांन निवडून देण्यात आम्ही मोलाची भूमिका बजावली आहे त्यामुळे आम्ही वझ याचं मत कन्नड गटाकडे वळवू असंही सेठ म्हणाले. कन्नड आणि उर्दू गटातून जयश्री माळगी, याचं नाव आघाडीवर आहे. कोणत्याही गटातील एक दोन नगरसेवक जरी फुटले तर चित्र वेगळ असणार आहे .
मराठी गटात समेटा साठी प्रयत्न
सत्ताधारी २३ आणि समविचारी ९ अश्या ३२ नगरसेवकात संमेट घडवण्यासाठी रविवारी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे . दोन्ही गटातील प्रमुख नगरसेवक आणि आमदार संभाजी पाटील, या बैठकीस उपस्थित राहणार आहेत . पंच मंडळी युवक कार्यकर्ते , माजी नगरसेवक उद्योजक आणि वकिलांचा दबावगट तयार झाल्याने मराठी नगरसेवकांच्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समेट बैठकीस काही मध्यस्थीची उपस्थिती देखील असणार आहे त्यामुळे रविवारी सायंकाळी पर्यंत चित्र स्पष्ट होईल .
पक्षीय बलाबल
मराठी गट सत्ताधारी २३ , समविचारी ९
कन्नड उर्दू गट:२५ निवडून आलेले प्रतिनिधी : ५