बेळगाव दि २० : माझ्या घरात झालेल्या आयकर छाप्यात तीन लाख ७ हजार रोख रक्कम मिळाली आहे यापेक्षा अधिक रक्कम मिळालेली सिद्ध झाल्यास येदुराप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करेन अस पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटलंय .
बेळगाव जिल्हा पंचायत मासिक बैठकीवेळी पत्रकारांनी आयकर खात्याच्या छाप्याबद्दल विचारलं असता बोलत होते. आमच्या वकिलांनी मेडिया मध्ये या विषयाबद्दल जास्त बोलू नये असा सल्ला दिला आहे त्यामुळे आम्ही याबद्दल वक्तव्य करण टाळत आहोत असेही ते म्हणाले . बेळगाव जिल्ह्यातील उन्हाळी दुष्काळ निवारासाठी प्रत्येक १५ दिवसात एक बैठक असून कृष्णा नदीतून कर्नाटकास पाणी सोडण्याची विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे लवकरच प्रतिनिधी मंडळ पाठविणार आहोत अस त्यांनी नमूद केल.