बेळगाव दि ३ : अखिल भारतीय ९० मराठी साहित्य संमेलनात बेळगाव प्रश्नाचा आवाज घुमला . शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी बेळगावकरांनी बेळगाव सह संयुक्त महराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषान दिल्या आणि साऱ्यांच लक्ष वेधून घेतल . डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन होत आहे आजच्या उद्घाटना दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं भाषण होत त्यावेळी एकीकरण समितीचे एल आय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सीमा प्रश्नाच्या घोषणा दिल्या . यावेळी मुखमंत्र्यांनी देखील प्रतिसाद देत बेळगावकरांची मागणी रास्त आहे अस संबोधल्या वर सगळयांनी टाळ्या वाजविल्या . यावेळी येळ्ळूर नवहिंद ग्रुप चे प्रकाश अष्टेकर , संभाजी कणबरकर , नारायण जाधव , प्रदीप मुरकुटे उपस्थित होते
Trending Now
Less than 1 min.
Previous article