बेळगाव दि ३ : बेळगाव महा पालिकेच्या हलगा जवळ होणाऱ्या सांडपाणी प्रकल्पा साठी भूसंपादनाची धारवाड उच्च न्यायालयात सरकारी वकिलांने वेळ मागितल्याने सुनावणी १७ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे .
हलगा अलारवाड क्रॉस जवळ महा पालिकेला सांड पाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची १९ एकर २० गुंठे सुपीक जमीन संपादन करण्याचा घाट घातला आहे . सदर सुपीक जमीन बळकाऊ नये यासाठी बेळगाव शेतकरी संघटना आणि नारायण सावंत यांच्या पुढाकारातून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे या खटल्याची शुक्रवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलाने वेळ मागितल्याने न्यायलयान १७ फेब्रुवारी ला सुनावणी पुढे ढकलली आहे . शेतकऱ्यांच्या वतीने अड रवी गोकाककर काम पाहत आहेत .