बेळगाव दि १२ : मुस्लीम संघटना पाठोपाठ मराठी क्रांती मोर्चास दलित संघटना देखील पाठिंबा देण्यास पुढे सरसावल्या आहेत . बेळगावातील मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासठी केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करावा आणि समस्यांचं समाधान कराव अशी मागणी विविध दलित संघटनांनी यावेळी केली आहे . अखिल भारतीय दलित युवक संघटना दलित एकता परिषद, जयभीम सांस्कृतिक कला मंडळ अश्या संघटना नी मराठी मोर्चास पाठिंबा दिला आहे. यावेळी सुधीर चौगुले, विनोद सोलापुरे आनंद चौगुले, दीपक चौगुले रामानंद मेस्री रवी कांबळे उदय कांबळे कृष्णा रेड्डी सागर तलवार आणि नितीन रामचन्नावर आदि उपस्थित होते . यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रकाश बापू पाटील विजय होनगेकर गणेश दड्डीकर आणि संजय पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला .