बेळगाव दि २४ :बनावट कागदपत्र तयार करून भूखंड लाटल्याच्या आरोपावरून नगरसेविका मैनाबाई चौगुले आणि त्यांचे पती शिवा चौगुले यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .ऐन महापौर निवडणुकीत हा गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ माजली आहे .
पालिका अधिकारी एस राजशेखर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भूखंड लाटल्या प्रकरणी कलाम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अरुण नागे गौडा अधिक तपास करत आहेत. रामनगर येथील सरकारी जमीन सी टी एस क्रमांक ६९८९ भूखंड लाटण्यात आल्याचे निदर्शनास येताच पालिका अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे .या भूखंडावर बांधकाम करण्यात आला आहे . पोलीस नगरसेविक आणि त्यांच्या पतींचा शोध घेताहेत .