बेळगाव दि २ : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा क्रांती मोर्चा साठी मूक मोर्चात सामील झालेल्या साठी आचार संहितेची घोषणा करण्यात आली आहे . खानापूर येथील जन जागृती बैठकीत कार्यकर्त्या नी आणि मोर्चात सामील झालेल्यांनी पाळायच्या अटी आणि नियम मोर्चा संयोजकांनी जाहीर केल्या आहेत . सकल मराठा समाजाचे बेळगाव संयोजक प्रकाश मरगाळे यांनी पत्रकाचे अनावरण करून संहिता नियम जाहीर केले . मोर्चात लाखो लोक सहभागी होणार आहेत त्यामुळे कोणतीही गडबड गोंधळ न होता शांततेत हा मोर्चा पार पडणे गरजेचे आहे बेळगाव लाईव्ह देखील समस्त जनतेला आवाहन करत आहे की संयोजकांनी दिलेल्या नियमांचं पालन करा आणि मोर्चा शांततेत यशस्वी करा खालील मोर्चात सामील होणाऱ्या साठी नियम आणि अटी खालील प्रमाणे
- हा मूक मोर्चा आहे मोर्चात चालत असताना एकमेकात बोलणार नाही
- घोषणा देणार नाही
- मी मोर्चाचे गांभीर्य राखणार कोणी घोषणा दिल्यास त्यांला तिथेच रोखणार
- मोर्चात अधिकृत ब्यानर शिवाय कोणत्याही वयक्तिक पक्ष /संस्था /संघटनच्या नावे बनर्स लावणार नाही
- दररोज ५० मराठ्या कडे ही माहिती पोचविणार
- मोर्चा कोणत्याही जाती धर्म आणि भाषे विरोधात नाही मराठ्याच्या मागण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी आहे
- मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार मोर्चा कोणत्याही पक्ष संघटनेचा नसून मराठा म्हणून येणार
- मोर्चाच्या दिवशी १० वजता कुटुंबां सह दाखल होणार
- मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाचा सुसंस्कृत पणा दाखविणार व पोलिसांना सहकार्य करणार मोर्चात कोणतेही व्यसन करून मी सहभागी होणार नाही आणि कुणालाही व्यसन करू देणार नाही
- महिला लहान मुल आणि वृद्धाना सहकार्य करणार माता भगिनींना पुढे जाऊ देईन
- मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालत जाणार मी घाई गडबड करणार नाही
- मोर्चाला अत्यंत शांतपणे येणार आणि शांतपणेचा परत जाणार कुणालाही माझा त्रास होईल असे माझे वार्ता राहणार नाही
- मोर्चात झालेला कचरा रिकाम्या पाण्याच्या बाटल्या पाउच आणि पडले ग्लास आदी कचरा उचलून कचऱ्याच्या कुंडीत टाकीन
- स्वाभिमान स्वावलंबन शिक्षण सहकार्य जागृती या पंच सूत्रीचा समाज विकासासाठी अंगीकार करणार