बेळगाव दि १० : घरात कोणी नसलेलं पाहून चोरट्यांनी सदाशिव नगर चौथा क्रॉस येथील एका घरात कुलूप तोडून ४ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे .
अश्विनी विश्वनाथ अमाशी(२९) यांच्या घरात शुक्रवारी पहाटे चोरांनी डल्ला मारून ११० ग्राम सोने आणि इतर मौल्यवान वस्तू अस चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे . आज बाजूंला केवळ दहा फुटाच्या अंतरावर दोन घर असून घरात कोणी नसलेले पाहून सदर चोरी करण्यात आली आहे . पोलिसांनी दिलेल्या महिनुसार अश्विनी या एकट्याच घरात सारहात असतात मागील १८ जानेवारी ला त्या आपल्या पतीकडे दुबई ला गेल्या होत्या त्या १५ फेब्रुवारी बेळगावला परत येणार आहेत . शेजारील लोकांनी कुलूप तोडलेला पाहून पोलिसांना कल्पना दिली मग पोलिसानी अश्विनी बहिणीला संपर्क साधून सगळी माहिती मिळविली ए पी एम सी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे