बेळगाव दि १७ : शनिवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे . सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्रिशंकू अवस्था असल्याने कुणाच्या कोण कुणासोबत जाऊन युती करील आणि कुणाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडेल याकडे लक्ष लागल आहे. या त्रिशंकू अवस्थेमुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे .
कॉंग्रेस बहुमतात असल तरी माजी मंत्री सतीश जारकीहोळी आणि पालक मंत्री रमेश जारकीहोळी असे दोन गट पडले आहेत . ए पी एम सी एकुण सदस्य संख्या १७ आहे त्यापैकी कॉंग्रेसच्या दोन्ही गटाकडे सहा सदस्य आहेत तर एकीकरण च्या दोन्ही गटाकडे मिळून सहा सदस्य मराठी भाषिक आहेत . यात एका गटाकडे महेश जुवेकर(येळळूर) आर के पाटील( पिरनवाडी), तानाजी पाटील(बेळगाव शहर) तर दुसऱ्या गटाकडे आप्पा जाधव(बेळगुंदी) तलवार(सांबरा) आणि महेश कुगजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही .
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दोन्ही गटांनी समितीच्या सदस्याशी संपर्क साधला असून उपाध्यक्ष पदाची ऑफर दिली आहे मात्र समिती नेत्यांनी जो कोन अध्यक्ष पद देईल त्याच्या सोबत युती करण्याचा प्रयत्न सुरु केलेत . सध्या सतीश जारकीहोळी यांचे सहा सदस्य बंगळूरू मुक्कामी असून शनिवारी सकाळी बेळगावला पोचतील या नंतर सगळ ठरल जाणार आहे . तर दुसरीकडे कॉंग्रेस कार्यकर्त्या तून उचगाव कॉंग्रेस चे युवराज कदम यांनाअध्यक्ष करा अशी मागणी केली जात आहे . या निवडणुकीत एका सदस्याची किंमत ३ लाखां पर्यंत चालली आहे अशी माहिती मिळाली आहे . एकीकरण च्या दोन्ही गटांनी पुढील धोरण पाहून एकीने युती केल्यास अध्यक्ष पद मिळेल अशी शक्यता आहे मात्र या साठी दोन्ही गटातील भूमिका काय बजावतात याकडे सर्वांच लक्ष लागल आहे