बेळगाव दि 9 : राज्यधानी दिल्ली प्तमाणे बेळगाव शहरात देखील इलेक्ट्रिक वर चालनारा ऑटो रिक्षा फिरताना दिसत आहे . विना पेट्रोल आणि डीझेल वर चालणाऱ्या पर्यावरण पूरक असलेल्या ऑटो रिक्षाला प्रवाश्या कडुन मागणी वाढत आहे .
इलेक्ट्रिक वर चालणारी केवळ एकमेव रिक्षा सध्या बेळगाव शहरात फिरत असून ज्या कंपनी ने ही रिक्षा तयार केली आहे त्यांनी बेळगाव शहरासाठी सध्या ट्रायल बेस वर एकच रिक्षा दिली आहे . सध्या आणि या रिक्षांमधला फरक असा आहे की या इलेक्ट्रिक रिक्षात प्रवाश्याना बसायला जास्त जागा आहे . ३ तास करंट वर चार्ज केल्यास इलेक्ट्रिक रिक्षा ८० कि मी लांब पल्ला गाठू शकते त्यामुळे प्रवाश्याना भाडे दर खूप कमी बसते त्यामुळे याच आकर्षण प्रवाश्याना जास्त होऊ शकते . बसवंन कुडची विजय वस्त्रद नावाच्या ऑटो चालकाने इलेक्ट्रिक रिक्षा चालवायला सुरुवात केली आहे नेहमीच्या रिक्षा पेक्षा या कमी दराने भाडे आकारून तो रिक्षा चालवत आहे .