बेळगाव दि ५ : एकीकडे सरकारी संस्था सोशल मिडिया पासून दूर असतात मात्र बेळगाव पोलीस आयुक्तांच फेस बुक पेज गेल्या २ फेब्रुवारी पासून लागलीच अपडेट होत आहे . २ फेब्रुवारी ला बेळगाव पोलिसांनी शार्प शुटर्स ना अटक केल्याची बातमी प्रसारमध्यमा बरोबर पोलीस आयुक्तांच्या पेज वर देखील अपडेट केली गेली आहे. त्या नंतर दररोज बेल्ग्व पोलीसांच पेज अपडेट केल जात आहे .
सोशल मिडिया च महत्व आणि इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची दिवसेंदिवस होणारी वाढ बघून बेळगाव पोलिसांनी हे चांगल पाऊल आपल्या हाती घेतल आहे .२०११ मध्ये बेळगाव पोलिसांनी फेस बुक पेज काढल असून ट्विटर अकौंटंट देखील आहे मात्र ट्विटर वापरणाऱ्यांची कमी संख्या पाहून ट्विटर पेज अपडेट नाही आहे . पोलिसांनी बऱ्याच बातम्या फेस बुक पेज वर अपलोड केल्याने फेस बुक वापरणाऱ्या वाचकांना याचा लाभ होत आहे . देशात बंगलोर ट्राफिक पोलीस ,चंडीगड ट्राफिक पोलीस ,दिल्ली ट्राफिक आणि मुंबई ट्राफिक पोलीस या शहरांची फेस बुक ,ट्विटर अशी पेज सतत अपडेट असतात रस्ता सुरक्षे च्या दृष्टी कोणातून सोशल मीडियातून केलेल्या तक्रारी वर लागलीच पोलिसाकडून दखल घेतली जाते बेळगाव पोलिसाकडून देखील आपण हीच अपेक्षा करायला हरकत नाही .
बेळगावचे माननिय पोलिस आयुक्त साहेबांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून दिलासा द्यावा.