बेळगाव दि ३० : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावात १७ फेब्रुवारीला होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्यात प्रत्येक मार्थ आणि मराठी माणसाची उपस्थिती आपल कर्तव्य आणि जबाबदारी आहे अस समजून झाली पाहिजे अस आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलय
शहरातील ओरिएटल शाळेच्या सभागृहात बेळगावातील मार्थ आणि मराठी बांधवांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीत शेतकरी युवक महिला व्यापारी उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता . १७ फेब्रुवारीच्या मराठा क्रांती मोर्च्याच कश्या पद्धतीन आयोजन केल जाव, आचार संहिता कशी असावी मार्ग कसा असा कोण कोणत्या मागण्या निवेदनात सामील केल्या जाव्यात यासाठी कार्यकर्त्यांनी सूचना केल्या . कर्नाटकात माथा समाजाला आरक्षण मिळाव , १७ फेब्रुवारी बेळगाव शहरातील सर्व लोकांनी नो वेहिकल डे म्हणून पाळावा याच्यासह कर्नाटकातील पाठ्य पुस्तकात शिवाजी महाराजांच्या धडा सामील करावा अश्या सूचना केल्या . प्रत्येकाच्या सूचना दखल घेऊन मार्गदर्शन सूची तयार केली जाईल त्यानुसार प्रत्येकानं आपला सहभाग नोंदवावा अस आवाहन सकाळ मराठा समाजाच्या वतीन करण्यात आल .