बेळगाव दि ३१ : तीन महिन्या पासून इलेक्ट्रिक बिल न भरल्या मुळे विद्युत पुरवठा बंद केल्या नंतर दुसऱ्या दिवशी गावात गेलेल्या दोन लाइनमन आणि ग्राम पंचायत सदस्यांत मारामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील गोजगा गावात घडली आहे . या प्रकरणी पंचायत सदस्या विरोधात काकती काकती पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार गोजगा ग्राम पंचायत सदस्य चेतन पाटील यांनी गेले तीन महिने आपल्या घरच इलेक्ट्रिक बिल भारल नव्हत त्यामुळे हेस्कोम च्या लाइन मन नी सोमवारी त्यांच्या घरच कनेक्शन बंद केल होत त्यामुळे मंगळवारी गोजगा गावात दोन लाइन मन फिरत असतेवेळी चेतन पाटील जाब विचारला आणि दोघात बाचाबाची झाली अशी माहिती समोर आली आहे . काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक अधिक तपास करताहेत .